डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
पेठ, ता.- ०७- डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ व कर्मवीर दादासाहेब बिडकर इंग्लिश मिडियम स्कूल पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळावी व त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आज विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती हेमलताताई बिडकर होत्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संचालक श्री श्रीकृष्ण चंद्रात्रे, श्री अरविंद देशपांडे, श्री मनोज गुंजाळ, श्री महेश डबे, श्री कांतीलाल राऊत, श्री जगदीश शिरसाठ, पोलीस निरीक्षक श्री. द्वारकानाथ गोंदके, पत्रकार श्री प्रकाश पगारे उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम स्वामी विवेकानंद व डॉ. विजयजी बिडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून विद्येची देवता सरस्वती, कर्मवीर दादासाहेब बिडकर, डॉ. विजयजी बिडकर व नटराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील राजेंद्र यांनी केले. यात त्यांनी विद्यालयाच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली, तसेच आजच्या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती हेमलताताई बिडकर यांनी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या तसेच सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन करावे व आपल्या पालकांनाही वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजावून सांगावे असा अनमोल संदेश यावेळी दिला. इतर कलागुणांबरोबरच अभ्यास व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे त्याचे भान सर्व विद्यार्थ्यांनी ठेवावे असे अनमोल मार्गदर्शन केले.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली यात ज्युनिअर केजी पासून ते बारावीपर्यंत च्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे नृत्याचे कार्यक्रम सादर केले. यात एकूण 54 कार्यक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री मधुकर मोरे, पर्यवेक्षक श्री दिलीप केला, उपप्राचार्य श्रीमती वसुधा आचार्य श्री प्रशांत वेढणे इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य श्री गौरव बागुल व वसतिगृह अधीक्षक श्री जितेंद्र सूर्यवंशी, श्री विनायक दोडे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जनार्दन वाघमारे, श्री. संजय सोनवणे, श्रीमती सुरेखा पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी मानले.
